राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी पिंपरी-चिंचवडमधील सुनील गव्हाणे यांची निवड

पिंपरी, दि. ३१ (पिंपरी-चिंचवड टाइम्स) – राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी पिंपरी-चिंचवडमधील सुनील गव्हाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पक्षातील एका निष्ठावंत आणि काम करणाऱ्या अभ्यासू कार्यकर्त्याला न्याय मिळाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया दुहण यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदी पारनेरच्या जितेश सरडे यांची नियुक्ती नक्की मानली जात होती. मात्र निष्ठावंत नाराज होतील यामुळे शेवटच्या क्षणी त्यांचे नाव मागे पडल्याचे कळत आहे. त्याऐवजी पिंपरी-चिंचवडमधील सुनील गव्हाणे यांच्या नावाला पसंती देण्यात आली. सुनील गव्हाणे यांनी यापूर्वी पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळले आहे. ते पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत.

Share this to: