याची माहिती आहे का तुम्हाला?; ऑगस्ट महिन्यात बँका १७ दिवस बंद असतील

पिंपरी, दि. ३१ (पिंपरी-चिंचवड टाइम्स) – ऑगस्टमध्ये बँका १७ दिवस बंद असणार आहेत. यामध्ये रविवार आणि दुसरा-चौथा शनिवार यांचाही समावेश आहे. अशा परिस्थितीत कोणत्या दिवशी बँका खुल्या असतील आणि कोणत्या दिवशी त्या बंद असतील हे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे.

बँकांची सुट्टी बकरी ईदच्या सुट्टीपासून सुरू होईल आणि ३१ ऑगस्टला ओणम उत्सवाने संपेल. १ ऑगस्ट रोजी बकरी ईदच्या निमित्ताने बँका बंद राहतील. दुसर्‍या दिवशी रविवार आहे. रक्षाबंधनाच्या निमित्तानेही बँकांना ३ ऑगस्टला सुट्टी असेल. ८ ऑगस्ट रोजी दुसरा शनिवार, ९ ऑगस्ट रोजी रविवार असेल. ११ ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त बँकांना सुट्टी असेल.

१२ ऑगस्ट रोजी जन्माष्टमीनिमित्त बँका बंद राहतील. १३ ऑगस्ट रोजी देशभक्त दिनानिमित्त इम्फाल झोनमधील बँकांना सुट्टी असेल. स्वातंत्र्य दिन असल्यामुळे १५ ऑगस्ट रोजी सर्व बँका बंद राहतील. २१ ऑगस्ट रोजी हरितालिका तीजनिमित्त बँकांना सुट्टी असेल. २२ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीनिमित्त बँकांमध्ये कोणतीही कामे होणार नाहीत. २९ ऑगस्ट रोजी कर्मपूजनामुळे बँकांना सुट्टी असेल. ३१ ऑगस्ट रोजी इंद्रायात्रा आणि तिरुणमच्या निमित्ताने बँकांना सुट्टी असेल.

एटीएममधून पैसे काढण्यात कोणतीही अडचण येणार नाही

तुम्हाला बँकेच्या या सुट्ट्या सविस्तरपणे जाणून घ्यायच्या असतील तर तुम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. येथे ऑगस्ट महिन्यासह, आपल्याला येत्या काही महिन्यांत कोणत्या दिवशी बँकाना सुट्टी असेल याची माहिती मिळेल. मात्र एटीएम व मोबाईल व्हॅनमुळे रोखीची समस्या दूर होईल.

Share this to: