पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या आणखी एका नगरसेवकाचा कोरोनाने घेतला बळी; नगरसेवक जावेद शेख यांचे निधन

पिंपरी, दि. ३१ (पिंपरी-चिंचवड टाइम्स) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी एक नगरसेवक जावेद शेख यांचे कोरोनामुळे शुक्रवारी (दि. ३१) निधन झाले.

नगरसेवक जावेद शेख हे आकुर्डी गावठाण प्रभागातून सलग तीनवेळा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले आहेत. त्यांना १६ जुलै रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यांना आकुर्डीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र तेथे प्रकृती खाल्यावल्यामुळे त्यांना पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचे आज निधन झाले.

दरम्यान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक आणि माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचे ४ जुलै रोजी कोरोनामुळे निधन झाले. आता राष्ट्रवादीचेच दुसरे नगरसेवक जावेद शेख यांचेही कोरोनामुळे निधन झाले आहे. आतापर्यंत कोरोनाने पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील दोन नगरसेवकांचा बळी घेतला आहे.  

Share this to: