सांगवीमध्ये २४ वाहनांची तोडफोड; पोलिसांनी तीन जणांना घेतले ताब्यात

चिंचवड, दि. २२ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन जणांच्या टोळक्याने सुमारे २४ वाहनांची तोडफोड केल्याची घटना गुरूवारी (दि. २३) सकाळी समोर आली आहे. पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले आहे. या टोळक्याने मध्यरात्री मद्यप्राशन करून लोखंडी रॉडने वाहनांची तोडफोड केली आहे.

कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन घोषीत झाल्यानंतर शहरातील तोडफोडीचे सत्र बंद होते. मात्र, ते आता पुन्हा सुरू झाल्याचे दिसत आहे. सांगवी परिसरात सुमारे २४ मोटारींची तोडफोड केल्याचे सकाळी समोर आले आहे. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.

बुद्ध हौसिंग सोसायटी, प्रियदर्शनीनगर, ममतानगर, संगमनगर, ढोरेनगर अशा दोन किलोमीटरच्या परिसरात वाहनांची तोडफोड झाली आहे. आधीच लॉकडाउनमुळे अनेकांची आर्थिक स्थिती बिकट बनलेली असताना अशा प्रकारे वाहनांच्या तोडफोडीचे नुकसान कोण भरुन देणार असा प्रश्न नागरिक करीत आहेत. सांगवी पोलीस तपास करीत आहे.

Share this to: