भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक विलास मडिगेरी यांनी इंद्रायणीनगर-बालाजीनगर प्रभागात विकासकामांना दिली गती

भोसरी, दि. १३ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती आणि विद्यमान नगरसेवक विलास मडिगेरी यांनी कोरोना महामारीमध्ये नागरिकांना मदतीबरोबरच आपल्या प्रभागातील विकासकामांना गती दिली आहे. कोरोनामुळे मार्चपासून थांबविण्यात आलेली कामे आणि नवीन कामांची मडिगेरी यांनी जागेवर जाऊन पाहणी केली. ही कामे दर्जेदार करण्याच्या सूचना त्यांनी अधिकारी आणि ठेकेदारांना दिल्या.

भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक विलास मडिगेरी हे गेल्या वर्षी स्थायी समिती सभापती होते. त्यावेळी त्यांनी प्रभाग क्रमांक ८ इंद्रायणीनगर-बालाजीनगरमध्ये अनेक कामांसाठी कोट्यवधींची तरतूद करून घेतली आहे. तसेच प्रभागातील अनेक कामे मंजूर करून घेतली आहेत. मात्र ते स्थायी समिती सभापतीपदावरून पायउतार होताच कोरोना महामारीचे संकट आले. त्यामुळे संपूर्ण शहरातील विकासकामे बंद झाली.

कोरोनाचे संकट कायम असले तरी शहरातील जनजीवन हळूहळू पर्वपदावर येत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नगरसेवक विलास मडिगेरी यांनी आपल्या प्रभागातील विकासकामांना गती दिली आहे. मार्चपासून थांबविण्यात आलेली कामे आणि नवीन कामांना प्रभागात सुरूवात करण्यात आली आहे. या कामांची विलास मडिगेरी यांनी जागेवर जाऊन पाहणी केली. ही कामे दर्जेदार करण्यासाठी अधिकारी आणि ठेकेदारांना सूचना केल्या. विलास मडिगेरी यांनी गेल्या तीन-साडेतीन वर्षात प्रभाग क्रमांक ८ मध्ये अनेक चांगली कामे केल्याने या भागातील नागरिक त्यांच्या कामाविषयी समाधान व्यक्त करत आहेत.

Share this to: