महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ६ हजार ७८५ नवे करोना रुग्ण आढळले ;तर २१९ मृत्यूंची नोंद

मुंबई, दि.९ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ६ हजार ७८५ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर २१९ मृत्यूंची नोंद झाली. तर ४ हजार ६७ रुग्ण बरे झाले. त्यामुळे राज्यात बरे झालेल्या रुग्णांची आत्तापर्यंत १ लाख २७ हजार २५९ इतकी झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ५५.१९ टक्के इतका झाला आहे.

सध्या राज्यातील मृत्यूदर ४.१९ टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या १२ लाख २२ हजार ४८७ नमुन्यांपैकी २ लाख ३० हजार ५९९ नमुने करोना पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६ लाख ४९ हजार २६३ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ४८ हजार १९१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.राज्यात मागील चोवीस तासात जे रुग्ण आढळले आहेत त्यानंतर राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ९३ हजार ६५२ इतकी झाली आहे.

प्रमुख शहरांमधील अॅक्टिव्ह रुग्ण
मुंबई- २३ हजार ७८५
ठाणे- ३० हजार ५०६
पुणे- १७ हजार २२६
नाशिक- २५३४
औरंगाबाद- ३६९१
नागपूर- ४९१

Share this to: