पिंपरी-चिंचवडमधील कोरोना रुग्णांची संख्या ६ हजार पार; गुरूवारी ५६८ जणांना कोरोना, १७२ रुग्ण कोरोनामुक्त, ११ जणांचा मृत्यू

पिंपरी, दि. ९ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – पिंपरी-चिंचवडमध्ये गुरूवारी (दि. ९) तब्बल ५६८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच शहराबाहेरील कोरोना झालेल्या १९ नागरिकांना वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले आहे. आज शहरातील १७२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून ११ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

आज शहरातील ५६८ जणांना कोरोनाची बाधा झाल्याने शहरातील एकूण रुग्णांची संख्या ६ हजार ०६१ झाली आहे. आज १७२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत शहरातील ३ हजार ६८१ आणि शहराबाहेरील २६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत कोरोनामुळे पिंपरी-चिंचवडमधील ८६ जणांचा आणि शहराबाहेरील ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. गुरूवारी रात्री सात वाजेपर्यंत एकूण २ हजार २६५ कोरोना रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

आज ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये विठ्ठलवाडी (वय ६७), चिंचवडमधील महिला (वय ४८), काळेवाडीमधील महिला (वय ५०), आकुर्डी (वय ६३), रहाटणी (वय ६२), पिंपरी-गांधीनगरमधील महिला (वय ३८), पिंपरीतील दोघेजण (दोघांचेही वय ५१), आकुर्डी (वय ७०) तसेच शहराबाहेरील इंदुरी (वय ६५) आणि पुण्यातील (वय ६५) एका कोरोना रुग्णाचा समावेश आहे.

Share this to: