मा. राज्यमंत्री संजय (बाळाभाऊ) भेगडे यांच्या प्रयत्नातून तळेगाव दाभाडे शहरात उभारण्यात आलेल प्राथमिक आरोग्य केंद्र लवकरच नागरिकांच्या सेवेत

मळवली, दि.९ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – मा. राज्यमंत्री संजय (बाळाभाऊ) भेगडे यांच्या प्रयत्नातून जि.प.सदस्य नितिन मराठे नेतृत्वाखाली तळेगाव दाभाडे शहरात २ कोटींच्या निधीतून उभारण्यात आलेल आधुनिक सोयी सुविधांनी युक्त प्राथमिक आरोग्य केंद्र लवकरच नागरिकांच्या सोयीसाठी सज्ज होत आहे.

मावळ तालुक्यातील गरीब जनतेसाठी खूप मोठी सोय सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच मा.राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली जि.प.सदस्य नितीन मराठे यांच्या नेतृत्वाखाली ५ लाख रुपयांच्या निधीतून मावळ तालुक्यातील पाचणे गावातील येवले-कालेकर वस्ती रस्त्याचे काम देखील पुर्ण झाले आहे.

Share this to: