डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तळेगाव दाभाडे येथील बंगल्यावर पोलिस बंदोबस्त ठेवा; आरपीआयचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सुरेश निकाळजे यांची मागणी

पिंपरी, दि. ९ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – तळेगाव दाभाडे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंगल्यावर सुरक्षेच्या कारणास्तव २४ तास पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहर रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अध्यक्ष सुरेश निकाळजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात सुरेश निकाळजे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे, “पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे या ठिकाणी विश्वरत्न आणि भारतत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ऐतिहासिक वास्तू आहे. या बंगल्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काही दिवस वास्तव्य केले होते. ही वास्तू आंबेडकरी जनतेसाठी पवित्र आहे. मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृहाची काही समाजकंटकांनी नासधूस केली. त्यामुळे समस्त आंबेडकरी समाजाची अस्मिता दुखावली गेली आहे. असाच काही प्रकार पुन्हा घडू नये यासाठी विश्वरत्न आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तळेगाव दाभाडे येथील निवास्थानावर २४ तास पोलीस सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी निकाळजे यांनी केली आहे.”

Share this to: