‘सारथी’ला ८ कोटींची मदत जाहीर

मुंबई, दि.९ (पिंपरी चिंचवड टाइम्स ) – सारथी संस्थेला ८ कोटी रुपयांची मदत करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली आहे. उद्याच सारथी संस्थेला आर्थिक मदत देण्यात येईल, अशी माहिती पवारांनी दिली. सारथी संस्थेला भरीव आर्थिक मदत मिळावी आणि संस्थेची स्वायत्तता कायम राहावी, अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात येत होती. त्या संदर्भात आज मंत्रालयात महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला अजित पवार यांच्यासह खासदार संभाजीराजे छत्रपती, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित होते.

‘सारथीबद्दलची बैठक झाली. वेगवेगळ्या खात्यांचे अधिकारी देखील बैठकीला होते. मागे एकनाथ शिंदे यांनी मागे चर्चा केली होती. कोरोनाचं संकट असताना सारथी काही बंद केली जाणार नाही. वेगवेगळ्या अफवा या दरम्यान आल्या. मात्र सारथीबाबत सरकारची अतिशय सकारात्मक भूमिका आहे. मी माझं सर्वस्व पणाला लावून या संस्थेसाठी काम करणार आहे,’ असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

Share this to: